आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : गौरीने दिली शाहरुखला बर्थ डे पार्टी, हृतिक, वरुण, रणवीर, दीपिकासुद्धा पोहोचले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका पदुकोणसोबत शाहरुख खान, फराह खानसोबत गौरी खान)
मुंबईः शाहरुख खानने रविवारी आपला 49वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने पत्नी गौरीने त्याच्यासाठी एक खास बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
दीपिका पदुकोण, हृतिक रोशन, वरुण धवन, चंकी पांडे, मीका, रणवीर सिंह, मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, नेहा धुपिया, अली जाफरसह अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीत शाहरुखसोबत धमाल केली. पार्टीत अरमान जैनची आई आणि रणवीर कपूरची आत्या रीमा जैन यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. किंग खानने आपल्या बर्थडे पार्टीची खास छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती.
पार्टीची होस्ट अर्थातच गौरी खान यावेळी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसवर व्हाइट ब्लेजर घातले होते. तर शाहरुख यावेळी ब्लॅक शर्टमध्ये दिसला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहरुखच्या बर्थडे पार्टीची खास छायाचित्रे...