आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan’s ‘Happy New Year’ Team Back In India

'SLAM! The Tour'हून परतले 'इंडियावाले', पाहा स्टारकास्टची एअरपोर्टवरील छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फराह खान, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सोनू सुद, बोमण ईराणी आणि दीपिका पदुकोण)
मुंबई: फराह खान दिग्दर्शित 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाची टीम 'SLAM! The Tour'हून परतली आहे. या टीमने सिनेमाच्या प्रमोशनसाठी जगभर भटकंती केली. 'SLAM! The Tour'चा पहिला टप्पा संपला आहे.
या टूरमध्ये शाहरुख खान, अभिषेक बच्चन, बोमण ईराणी, सोनू सुद, दीपिका पदुकोण, विवान शाह, मलायका अरोरा खान, दिग्दर्शक फराह खानसोबत इतर क्रू-मेंबर्ससुध्दा सामील होते. सर्व स्टार्सकास्ट काल रात्री टूरहून परतले आहेत. मुंबई एअरपोर्टवर त्यांची झलक पाहायला मिळाली. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
SLAM! The Tourचा प्रवास हॉस्टनपासून सुरु केला होता. हॉस्टनच्या टॉयटा सेंटरमध्ये 19 सप्टेंबर रोजी प्रमोशन इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. टूरदरम्यान 'इंडियावाले', 'बबली' गाण्याचे प्रमोशनसुध्दा केले गेले.
या ठिकाणी करण्यात आले सिनेमाचे प्रमोशन-
20th Sept 2014: Continental Arena, New Jersey
21st Sept 2014: Air Canada Center, Toronto
26th Sept 2014: Sears Center Arena, Chicago
27th Sept 2014: Pacific National Exhibition (PNE), Vancouver
28th Sept 2014: SAP Center, San Jose
'SLAm! The Tour'चा पुढचा टप्पा लंडनमध्ये होणार आहे. येथे 5 ऑक्टोबर रोजी 'हॅप्पी न्यू इअर'ची टीम O2 अरीनामध्ये प्रमोशन इव्हेंट करणार आहे. या इव्हेंटमध्ये त्यांचे 'SLAM! The Tour' संपणार आहे. त्यानंतर हे स्टार्स देशात सिनेमाचे प्रमोशन करणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'SLAM! The Tour'हून परतलेल्या 'हॅप्पी न्यू इअर'च्या टीमची छायाचित्रे...