आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानने खरेदी केली सर्वात महागडी बॉम्बप्रुफ कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शाहरुख खानने एक महागडी बॉम्बप्रुफ कार खरेदी केली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'शाहरुखने अलीकडेच, मर्सडिज कार खरेदी केली आहे. मर्सडिज कारचे हे मॉडेल विशेषत: व्हिव्हिआयपीसाठी कस्टमाइज करण्यात आले आहे. या गाडीची किंमत कोटींमध्ये आहे.'
सांगितले जाते, की ही बॉलिवूड स्टार्सच्या गाड्यांपैकी सर्वाधिक महागडी गाडी मानली जात आहे.
शाहरुखने ही कार आपला मित्र आणि निर्माता अली मोरानीच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगनंतर दोन महिन्यात खरेदी केली. यावर्षी आमिर खाननेसुध्दा जवळपास दहा कोटींची बॉम्बप्रुफ कार खरेदी केली आहे. आमिर खानला सत्यमेव जयते शोमध्ये काही संवेदनशील मुद्दे उचलल्यानंतर धमक्या आल्या होत्या. म्हणून त्याने ही कार खरेदी केल्याचे कळाले होते.
अली मोरानीच्या घराबाहेर फायरिंग झाल्यानंतर अंडरवर्ल्डकडून शाहरुख खानलासुध्दा धमकीचे फोन आले होते, अशा बातम्या आल्या होत्या. परंतु त्यानंतर कळाले होते, की शाहरुखला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली नाही.