आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan At Ali Moranis Daughter Shirins Sangeet Ceremony

मित्राच्या मुलीच्या लग्नात वर-वधूंसोबत थिरकला शाहरुख, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नववधू शिरीन आणि वर उदयसोबत डान्स करताना शाहरुख खान, शेजारी गाताना सोनू निगम)
मुंबईः 'हीरोपंती' आणि 'लोको विकी' फेम बॉलिवूड अभिनेता विक्रम सिंहचा धाकटा भाऊ उदय सिंहच्या संगीत सेरेमनीचे आयोजन गुरुवारी जुहूस्थित एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते. उदय सिंहचे लग्न चित्रपट निर्माते अली मोरानी यांची लेक शिरीन मोरानीसोबत होत आहे. संगीत सेरेमनीत बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
संगीत सेरेमनीची थीम स्नो बेस्ड होती. यावेळी अभिनेता शाहरुख खानने वर-वधूंसोबत ताल धरला. शाहरुखने कल हो ना हो या सिनेमातील शीर्षक गीतावर डान्स केला. अली मोरानी शाहरुखचे जीवलग मित्र आहेत.
यावेळी सोनू निगम, अंकित तिवारी आणि शान यांनी अनेक गाणी गायली. संगीत सेरेमनीत माधुरी दीक्षित, हृतिक रोशन, जाएद खान, जॅकी भगनानी, रमेश सिप्पी, किरण जुनैजा, सोनू निगम, सुखविंदर सिंह आणि रितेश देशमुखसह ब-याच सेलेब्सची मांदियाळी जमली होती. यावेळी शान आणि सोनू निगम यांच्या पत्नींनीही संगीत सेरेमनीत हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा संगीत सेरेमनीची निवडक छायाचित्रे...