आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार प्रकरणातील आरोपी ड्रायव्हरची शाहरुखने केली हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: बलात्कार प्रकरणातील आरोपी राजेंद्र कुमार गौतम उर्फ पिंटू मिश्रा
मुंबई - बलात्कार प्रकरणातील आरोपी ड्रायव्हर राजेंद्र कुमार गौतम उर्फ पिंटू मिश्राला अभिनेता शाहरुख खानने नोकरीवरुन काढून टाकले आहे. शाहरुखने या घटनेनंतर तत्काळ पिंटूला त्याचा पगार देऊन नोकरीवरुन काढून टाकले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उघड झाल्यानंतर शाहरुखने तत्काळ हा निर्णय घेतला. आपल्या घरी काम करणारा व्यक्ती बलात्काराच्या आरोपात वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये बंद आहे, हे समजल्यानंतर शाहरुखला धक्का बसला होता. त्यामुळे त्याने तातडीने त्याची हकालपट्टी केली.
काय आहे प्रकरण...
26 जून रोजी बातमी आली होती, की अभिनेता शाहरुख खानचा ड्रायव्हर राजेंद्र गौतम उर्फ पिंटू मिश्राला एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पिंटू मिश्राला 26 जून रोजी वांद्रा कोर्टात हजर करण्यात आले होते. तेथे त्याला 1 जुलैपर्यंत रिमांडवर पाठवण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी अभिनेत्री संगीता बिजलानीच्या घरी कामाला होती. ती मुळची लातूरची आहे. गेले आठ महिने ती संगीता बिजलानीकडे घरकाम करतेय. परंतु, बऱ्याच दिवसांपासून ती जास्त पगाराची नोकरी शोधत होती. त्यासाठी तिने पांडे नावाच्या व्यक्तीला फोन केला. त्यानेच तिला राजेंद्रचे नाव सांगितले. गेल्या आठवड्यात त्याने राजेंद्रला मोलकरणीचा नंबर दिला. त्याने लगेचच तिला फोन करून 20 जूनला शाहरुखच्या बंगल्याजवळ बोलावले. ती तिथे पोहोचली, तेव्हा शाहरुख घरी नसल्याचे सांगून तो तिला नालासोपाऱ्याला घेऊन गेला होता आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीने पीडितेला दिली होती मुंबई सोडण्याची धमकी..
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला तिच्या गावाचे तिकीटही काढून दिले होते. येथे राहलीस तर तुझी काही खैर नाही, अशी धमकीही त्याने तिला दिली होती. मात्र तरीदेखील ती दुसऱ्या दिवशी शाहरुखच्या बंगल्याबाहेर पोहोचली. तेव्हा तिला पाहून राजेंद्र चिडला आणि आणि त्याने तिला बेदम मारहाण केली.
1 जुलैपर्यंत पोलिस रिमांडवर पाठवले...
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन भांदवी कलम 366(A), 376, 506(2) आणि (5) अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोर्टाने आरोपीला 1 जुलैपर्यंत रिमांडवर पाठवले आहे.
शाहरुखच्या मुलीला शाळेत ने-आण करायचे काम...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र साकीनाका येथील रहिवासी होती. 35 वर्षीय राजेंद्र शाहरुखच्या मुलीला शाळेत ने-आण करायचे काम करायचा.