आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई गौरीसह दिसले आर्यन आणि सुहाना, पाहा दोघांचे Latest Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुहाना खान, गौरी खान आणि आर्यन खान
मुंबई: बॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना आता यंग झाले आहेत. दोघेही मागील शनिवारी (28 जून) आई गौरीसह दिल्लीमध्ये बेकरी शॉप्सच्या ओपनिंग इव्हेंटमध्ये दिसले. दिल्लीमध्ये गौरी तिच्या माहेरी गेली होती.
आर्यन आता 17 वर्षांचा झाला असून त्याच्याकडे बघून तारुण्यातील शाहरुखची आठवण होते. आर्यन इव्हेंटमध्ये काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये पोहोचला होता. तो शाहरुखसारखा दिसायला लागला आहे असाच अभास त्याच्याकडे बघितल्यावर होतो. तसेच मुलगी सुहानासुध्दा आता 14 वर्षांची झाली आहे. या इव्हेंटमध्ये ती पांढ-या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली.
शॉप ओपनिंग इव्हेंटमध्ये गौरीसुध्दा खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिने पांढ-या रंगाचे टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेली होती. तसेच ओठांना लाल रंगाची लिपस्टिक आणि डोळ्यावर गॉगल लावलेला होता. यावेळी ती म्हणाली, 'मी दिल्लीची रहिवाशी आहे. इथे मी लहानाची मोठी झाली आहे. माझे आई-वडीलसुध्दा इथेच राहतात. जेव्हा कधी इथे येते तेव्हा चांगले वाटते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्यन, सुहाना आणि गौरीची लेटेस्ट छायाचित्रे...