आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृतीयपंथीयाची भूमिका वठवणार शक्ती कपूर, पाहा सिनेमा लाँचिंग इव्हेंटचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तृतीयपंथीयाच्या लूकमध्ये शक्ती कपूर
मुंबई: अभिनेते शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांनी सिनेमामध्ये खलनायकापासून ते अभिनेत्यापर्यंत प्रत्येक भूमिका चोख पार पाडली. आता हा बॉलिवूड स्टार पुढील सिनेमात नवीन अवतारात दिसणार आहे.
शक्ती कपूर 'रक्त दार' या आगामी सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमात ते तृतीयपंथीयाचे पात्र साकारणार आहे. सिनेमाचा लाँचिंग इव्हेंट मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तृतीयपंथीयाच्या गेटअपमध्ये पोहोचले होते. उपस्थितीतांसाठी त्यांचा हा गेटअप एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हता. त्यांनी गोल्डन-मरुन रंगाची सलवार सूट परिधान केलेला होता. सोबतच त्यांनी विग लावलेले होते. शक्ती कपूर यांच्या या सिनेमाचे दिग्दर्शन अजीत खान करत आहे.
इव्हेंटदरम्यान त्यांच्यासह अभिनेता एजाज खानसुध्दा दिसला. इव्हेंटमध्ये अभिनेता शहबाज खान आणि अली खानसुध्दा सामील होते. शक्ती कपूर यांनी अलीकडेच रिलीज झालेल्या 'मै तेरा हिरो' सिनेमात जॉनीची भूमिका वठवली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तृतीयपंथीयाच्या गेटअपमध्ये इव्हेंटला पोहोचलेल्या शक्ती कपूर यांची छायाचित्रे...