आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shamita Shetty And Many Bold Actresses Who Failed In Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: बोल्डनेस आले नाही कामी, शमितासह या 7 अॅक्ट्रेस ठरल्या Flop

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः शमिता शेट्टी)

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने आज वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 फेब्रुवारी 1979 रोजी शमिताचा जन्म झाला. 'मोहब्बतें' या सिनेमाद्वारे तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा सिनेमा हिट ठरला, मात्र शमिता हिट होऊ शकली नाही. सततच्या अपयशामुळे तिने फिल्मी दुनियेतून काढता पाय घेतला आहे.
शमिताचे प्रमुख सिनेमेः
'मोहब्बतें'सारख्या मल्टीस्टारर सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात करणा-या शमिताला बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही. तिच्या प्रमुख सिनेमांमध्ये ‘मेरे यार की शादी है’, ‘फरेब’, ’जहर’, ‘बेवफा’, ‘कॅश’ या सिनेमांचा समावेश आहे. जून 2011 मध्ये शमिताने बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा केली. आता इंटेरियर डिझायनिंगकडे तिने आपला मोर्चा वळवला आहे.
बोल्ड इमेजचा झाला नाही फायदा..
मोहब्बतें या पहिल्याच सिनेमात शमिता बोल्ड अंदाजात पडद्यावर अवतरली होती. 'साथिया' आणि 'मेरे यार की शादी है' या सिनेमांमध्ये तिने आयटम नंबरदेखील केले आहेत. सिनेमे आणि फोटोशूट्समध्ये तिचा लूक बोल्ड आणि ग्लॅमरस होता. मात्र तरीदेखील तिला या बोल्डनेसचा फायदा करिअरमध्ये होऊ शकला नाही.
बोल्ड रुपात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचा फॉर्मुला केवळ शमितासाठीच नव्हे तर अनेक अभिनेत्रींसाठी फ्लॉप ठरला आहे. गेल्या काही वर्षांत बोल्ड एन्ट्री घेणा-या अभिनेत्रींचे बॉलिवूड करिअर संपुष्टात आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही अभिनेत्रींविषयी...