आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shamitabh : Dhanush To Play A Deaf Mute Man In Movie

INTERVIEW: धनुष म्हणाला, 'जावयापूर्वी मी रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शमिताभच्या एका सीनमध्ये अमिताभ बच्चन आणि धनुष)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता धनुषची ओळख केवळ सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई म्हणूनच नाहीये, आतापर्यंत त्याने स्वत:ला स्थापित केले आहे. 'व्हाय दिस कोलावरी डी' गाण्यापासून देशभरात प्रसिध्द झाला आहे, धनुषने 2013मध्ये रोमँटिक ड्रामा 'रांझणा' सिनेमामध्ये सोनम कपूरसोबत काम करून त्याने प्रशांसा मिळवली.
रांझणानंतर धनुष पुन्हा एकदा आपल्या 'शमिताभ' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. फेब्रुवारीमध्ये रिलीज होणा-या या सिनेमात धनुषसोबत अमिताभ बच्चन आणि कमल हसनची मुलगी अक्षय हसनसुध्दा दिसणार आहे. धनुषने यापूर्वी 28 तामिळ सिनेमांमध्ये काम केले आहे, त्याला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे.
धनुषच्या सांगण्यानुसार, 'लोक मला विचारतात, तू टॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्ही सिनेसृष्टीत काम केले आहे. दोन्हीमध्ये काय फरक आहे. यावर माझे उत्तर असे असेल, 'भाषा, कल्चर, वातावरण आणि खाणे-पिणे सोडून काहीच फरक नाहीये. जसे, दाक्षिण तामिळ सिनेमे बनतात तसेच येथे हिंदी.' धनुषने आपल्या आमागी 'शमिताभ'विषयी जास्तकाही सांगितले नाही, कारण सिनेमाचे दिग्दर्शक आर. बल्की यांनी सिनेमाविषयी गुपित गोष्टी सांगण्यास मनाई केली आहे. धनुष सिनेमात म्यूट ज्यूनिअर आर्टिस्टची भूमिका साकाणार आहे आणि त्याला अमिताभ यांनी आवाज दिला आहे, एवढेच धनुषने सांगितले.
divyamarathi.comने मुंबईमध्ये शमिताभच्या प्रमोशनदरम्यान धनुषसोबत बातचीत केली, त्या बातचीतचे काही अंश...
प्रश्न- 'व्हाय दिस कोलावरी डी' गाऊन तू केवळ भारतच नव्हे जगभरात प्रसिध्द झालास. यूट्यूबवर व्हिडिओने धूम घातली. शमिताभमध्ये लोकांना तुझा आवाज ऐकायला मिळणार नाही. मग तू ही भूमिका स्वीकरली?
उत्तर- मला या प्रश्नाचे उत्तर देण्याची परवानगी नाहीये. दिग्दर्शक आर. बल्की यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, की सिनेमाविषयी जास्त बोलायचा नाही. मला वाटते, पटकथा आणि कहाणीशी माझा संबंध आहे. सिनेमाची संकल्पना खूप वेगळी आहे, एवढेच मी सांगू शकतो. मी प्रेक्षकांशी जोडलेला आणि प्रेक्षक माझ्याशी, सिनेमा माझी अशी भूमिका आहे.
प्रश्न- तू तुझ्या सार-यांना 'रजनी सर' म्हणतोस. त्यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न करून किती दिवस झाले?
उत्तर- दहा वर्षे, आम्हाला दोन मुले आहेत. यात्रा 9 लिंगा 5 वर्षांचा. मिस्टर बच्चन दोघांचे आयकॉन आहेत. मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो, की मला रजनी सर यांच्या कुटुंबाचा सदस्य होण्याची संधी मिळाली. मी नेहमी रजनी सरांचा मोठा चाहता राहिलो आहे. मी आजसुध्दा त्यांचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहतो. मी त्यांच्या जावईपेक्षा त्यांचा मोठा चाहता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा धनुषची संपूर्ण मुलाखत...