आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहगल यांच्या चाहत्या होत्या शमशाद बेगम, 14 वेळा पाहिला होता 'देवदास'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कही पे निगाहे कही पे निशाना’, ‘मेरे पिया गये रंगून’, ‘कभी आर कभी पार’, ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘लेके पहला पहला प्यार’ यासारख्या गीतांना आपल्या मधूर आवाजाने अजरामर करणार्‍या भारतीय चित्रपट सृष्टीतील जुन्या काळच्या महान पार्श्‍वगायिका शमशाद बेगम यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे. गेल्या वर्षी 24 एप्रिल 2013 रोजी वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
गतकाळातील चुलबुली अभिनेत्रींचा शमशाद बेगम आवाज होत्या. त्यांनी हिंदी आणि उर्दू भाषेतील तब्बल पाचशेहून अधिक गाणी आपल्या आवाजात स्वरबद्ध केली होती. त्यापैकी अनेक गाणी आजसुद्धा सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत.
त्यांनी गायलेली सदाबहार गाणी म्हणजे -
'छोड बाबुल का घर', 'होली आई रे कन्हाई', 'गाडी वाले गाडी धीरे हांक रे' (मदर इंडिया), 'तेरी महफिल में किस्मत आजमा कर' (मुगल-ए-आजम), 'मेरे पिया गए रंगून' (पतंगा), 'कभी आर कभी पार' (आर पार), 'लेके पहला पहला प्यार', 'कहीं पे निगाहें कहीं पे निशाना' (सीआयडी), 'मिलते ही आंखे दिल हुआ दीवाना किसी का' (बाबुल), 'बचपन के दिन भुला न देना' ( दीदार ), 'दूर कोई गाए' (बैजू बावरा), 'सैया दिल में आना रे' (बहार), 'मोहन की मुरलिया बाजे',
'धरती को आकाश पुकारे' (मेला), 'नैना भर आये नीर' (हुमायूं), 'मेरी नींदों में तुम' (नया अंदाज़), 'कजरा मुहब्बत वाला' (क़िस्मत) या अजरामर गाण्यांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्मध्ये जाणुून घ्या शमशाद बेगम यांच्याविषयी बरंच काही...