आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक राजकीय थ्रिल "शांघाय"

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाकर बॅनर्जी यांनी ‘शांघाय’ नावाचा चित्रपट बनवला आहे, तो 8 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका प्रसेनजितने साकारली आहे. तो बंगाली चित्रपटाचा सुपरस्टार आहे. प्रसेनजित हिंदी चित्रपटातील लोकप्रिय नायक विश्वजित यांचा मुलगा आहे. या चित्रपटात अभय देओल, इम्रान हाश्मी आणि अनुरागची पत्नी कल्की कोचलिनदेखील मुख्य भूमिकेत आहेत. ब्रिटनची मॉडल स्कारलेट मेलिश चित्रपटात एक आयटम साँग सादर करणार आहे.
‘शांघाय’ हा एक राजकीय चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकांच्या दिवसांत एका सामाजिक कार्यकर्त्याचा कार अपघातात मृत्यू होतो. ही राजकीय हत्या असल्याचा एका जागरूक विद्यार्थी पत्रकाराचा ठाम विश्वास असतो. यात इम्रान हाश्मी अश्लील चित्रपटांना बनवण्याचा बेकायदा धंदा करत असतो आणि त्याच्याकडे हत्येचा ठोस पुरावा असल्याने सरकारला दोषी ठरवता येवू शकते असा दावा करतो.
या प्रकरणी सरकारची बदनामी झाल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी एका ऑफिसरला पाठवले जाते. यानंतर एक मुलगी, चित्रपट निर्माता आणि सरकारी कर्मचारी तिघ मिळून खर्‍याचा शोध लावतात.