आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रकुमारांच्या सिनेमात शरमन जोशी करणार अभिनय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘इश्क’, ‘दिल’, ‘बेटा’ आणि ‘ग्रँड मस्ती’सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक इंद्रकुमार सध्या दोन सिनेमांची योजना आखण्यात गुंतले आहेत. त्यातील पहिला सिनेमा एकता कपूरच्या बॅनरसोबत असून त्यामध्ये अनिल कपूरची प्रमुख भूमिका असणार आहे. इंद्र यांच्या सिनेमात शरमन जोशीचादेखील समावेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय तुषार कपूरचीही निवड केली जाणार असल्याचे कळते. मात्र, ही जोडी या सिनेमात आहे की, मस्ती फ्रँचायझीच्या तिस-या सिनेमात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या फ्रॅँचायझीचा दुसरा सिनेमा ‘ग्रँड मस्ती’ गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. शरमन-तुषार जोडी ‘मस्ती-3’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. याबाबत मात्र दोघांनीही मौन बाळगले आहे.