आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: एकेकाळी अशी दिसायची ही बोल्ड अभिनेत्री, बी-ग्रेड सिनेमांत केले आहे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादग्रस्त अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा आज 30 वर्षांची झाली आहे. 11 फेब्रुवारी 1984मध्ये हैदराबाद येथे जन्म झाला. तिची आई मुस्लिम आणि वडील ईसाई आहेत. शर्लिन एक मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने मोजक्याच सिनेमांत काम केले आहे. तिने मॉडेलिंगच्या काळात मिस हैद्राबाद हा किताब आपल्या नावी केला होता. हैदराबादच्या स्टेनली गर्ल्स हाय स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 16व्या वर्षीच इंडस्ट्रीकडे कल दाखवला आणि शर्लिन पहिल्यापासूनच बोल्ड इमेजमुळे चर्चेत राहिली आहे.
मुंबईमध्ये शर्लिनला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. संघर्षाच्या काळात ती दिसायला तर सुंदर होती, मात्र अभिनेत्री होण्यासाठी तिच्याकडे एक्स-फॅक्टर नव्हता. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात झिरो फिगरसह मॉडेलिंगमधून केली. ती ऑकेस्ट्रामध्ये गाणेसुध्दा गायला लागली होती. हळू-हळू तिने पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि तिला बी-ग्रेड सिनेमांत काम करण्याची संधी मिळायला लागली. त्यानंतर 'प्लेबॉय'ने मासिकाने तिला लोकप्रिय होण्याची संधी दिली. या या मासिकावर खूपच उत्तेजक दिसली. तिने या मासिकासाठी न्यूड पोजसुध्दा दिल्या होत्या, त्यामुळे ती वादात अडकली होती.
शर्लिनला 'कामसूत्र 3D'मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला. शर्लिनने या सिनेमात अंगप्रदर्शाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. मात्र तिने सिनेमाचा दिग्दर्शक रुपेश पॉलवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आणि सिनेमा सोडण्याची धमकी दिली होती. दोघांचा टि्वटर वार चांगला रंगला होता आणि हे प्रकरण मीडियामध्ये चर्चिले गेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा शर्लिनच्या आयुष्याविषयी काही माहित नसलेल्या गोष्टी...