आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY: पूर्वी काहीशी अशी दिसायची शर्लिन चोप्रा, वयाच्या 15व्या वर्षी केला होता मेकओव्हर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शर्लिन चोप्रा बालपणीची आणि आत्ताची छायाचित्रे)
मुंबईः हॉट, सेक्सी, बोल्ड आणि बिनधास्त म्हणून ओळखली जाणारी एक अशी अभिनेत्री जिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणूनही ओळखले जाते. या अभिनेत्रीचे नाव आहे शर्लिन चोप्रा. आपल्या हॉट अदांनी नेहमी चर्चा एकवटणा-या शर्लिनने आज वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहे. तिचा जन्म 11 फेब्रुवारी 1984 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत शर्लिन अगदीच साधी दिसायची. ती बरीच लठ्ठ होती. शिवाय तिला चष्माही होता. मात्र वयाच्या 15व्या वर्षी शर्लिनने स्वतःचा मेकओव्हर केला आणि मिस हैदराबाद हा किताब आपल्या नावी केला.
2002 मध्ये तिने 'वेंदू मबुलू' या तेलगू सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने तामिळ, इंग्रजी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला. 'प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय मेन्स मॅग्झिनसाठी न्यूड फोटोशूट करणारी शर्लिन पहिली भारतीय मॉडेल आहे. 2013मध्ये तिचा बॅड गर्ल हा म्युझिक अल्बम रिलीज झाला आहे.
सिनेमांसोबत शर्लिन काही टीव्ही शोजमध्ये झळकली आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोची ऑफर तिला देण्यात आली होती. मात्र तिने बाथरुममध्ये कॅमेरे लावण्याची अट ठेवली. तिचे म्हणणे होते, की कॅमे-यासमोर अंघोळ करणे पसंत करेल. शर्लिनची ही अट निर्मात्यांनी मान्य केली नव्हती. खरं तर नंतर ती या शोमध्ये झळकली, पण प्रेक्षकांना इम्प्रेस करु शकली नव्हती. शर्लिनने 'स्पिट्सविला 6' हा शो होस्ट केला होता. लवकरकच ती कामसूत्र थ्रीडीमध्ये झळकणार आहे.
शर्लिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिची काही ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत...