आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa And Raaj Kundra\'s New Jewellery Show Room Opening

शिल्पा शेट्टी गळ्यात नव्हे हातात घालते मंगळसुत्र, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल, अभिनेत्री, निर्मिती, ज्वेलरी डिझायइनर या सर्व कामां कसे व्यवस्थापन करते? असा प्रश्न जेव्हा शिल्पा शेट्टीला विचारण्यात आला तेव्हा ती उत्तर देते, की 'छंद असला तर सर्वकाही व्यवस्थित मॅनेज होते. परंतु कधी-कधी मी खूप गोंधळून जाते जेव्हा माझा मुलगा वियान माझ्याजवळ नसतो. म्हणून आज (24 मे) फ्लाइटने परत जाणार आहे.' शिल्पा शेट्टी शनिवारी सेक्टर-35मध्ये आपल्या ज्वेलरी स्टोअर, 'सतयुग बाय शिल्पा शेट्टी कुंद्रा'च्या उद्धाटनासाठी आपला पति राज कुंद्रासह आली होती. तिच्यासोबत झालेली ही मुलाखत...
मी माझे मंगळसुत्र गळ्यात घालण्यापेक्षा हातात घालते. सांगायचे झाले तर सर्व महिला आपल्या पतिला गळ्यात ठेवतात आणि मी माझ्या हातात. या ज्वेलरी शॉपमध्ये शिल्पा शेट्टीने डिझाइन केलेली ज्वेलरी आहेत. म्हणून तिने जे मंगळसुत्र घातलेले आहे तसे अनेक डिझाइन या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. हातात मंगळसुत्र घालण्याची तिची ही फॅशन खूप लोकप्रिय झाली आहे. म्हणून त्याची डिझाइनसुध्दा मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहेत. चंदीगढपूर्वी शिल्पाला आपले स्टोअर लुथियानामध्ये लाँच करायचे होते. तिने सांगितले, की ती स्वत: तयार केलेले ज्वेलरी घालते. मला वाटले, की मी माझे डिझाईन लोकांपर्यंत पोहोचवावे. यावर हसून राज कुंद्रा म्हणाला, 'आपल्या डिझाइन तिला कमर्शिअल करायच्या होते.' यावर शिल्पा म्हणते, 'मी घरी बसून डिझाइन बनवते आणि राज त्यावर पैसे खर्च करातात.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा शिल्पा आणि राज कुंद्रा यांची काही छायाचित्रे...
फोटो: जसविंदर सिंह