आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty And Her Husband Raj Kundra Meet With A Road Accident

रस्ता अपघातातून थोडक्यात बचावली शिल्पा शेट्टी, बाउंसर्सने फोडले गाडीचे काच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे दुर्घटनेत क्षतीग्रस्त झालेली कार, उजवीकडे अपघातानंतर पोलिसांसोबत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा)
मुंबईः गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे खासगी रक्षक आणि एका आप्ट्रा कारमध्ये स्वार असलेल्या तीन जणांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण त्या अपघातावरुन झाले, ज्यातून शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा थोडक्यात बचावले.
सविस्तर वृत्त असे, की शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्र एका शोरुमच्या उदघाटनासाठी जालंधरच्या दिशेने जात असताना वाटते एक ओव्हरटेक करणारी आप्ट्रा कार त्यांच्या कारच्या एवढ्या जवळून गेली, की त्यांच्यात थोडक्यात टक्कर होताहोता राहिली. त्यामुळे चिडलेल्या शिल्पाच्या खासगी रक्षकांनी आप्ट्रा कारची तोडफोड सुरु केली. यावेळी सुरक्षा रक्षक आणि कारमध्ये स्वार असलेल्या लोकांमध्ये धक्काबुक्की सुरु झाली. मात्र लवकरच हे प्रकरण शांत झाले आणि शिल्पा-राज जालंधरसाठी रवाना झाले.
घटनेनंतर शिल्पा आणि राज दोघेही मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देताना टाळताना दिसले. मात्र नंतर शिल्पाने आपली बाजू मांडली. ती म्हणाली, "मी तुम्हाला सांगू इच्छिते, की या दुर्घटनेतून आम्ही मरता-मरता वाचलोय. ती माणसे एवढी रफ ड्रायव्हिंग करत होते, की त्यांच्या कारची आमच्या कारला थोडक्यात धडक होताहोता राहिली."
शिल्पा पुढे म्हणाली, "नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. माँ दुर्गावर माझी खूप आस्था आहे. तिच्याच कृपेमुळे आम्ही बचावलो. ही घटना खूप भयावह होती. लोक खूप वाईट पद्धतीने गाडी चालवतात."
पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न...
काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात आला. मात्र मीडियाच्या दबावानंतर त्यांनी ही रस्ता दुर्घटना असल्याचे सांगितले. पोलिसांनी मीडियाला सांगितले, की प्रथमदर्शनी ही रस्ता दुर्घटना असल्याचे वाटत आहे. चौकशीनंतरच चुक कुणाची होती, हे सांगता येईल.
आप्ट्रामध्ये स्वार होते तीन जण...
ज्या आप्ट्रा कारसोबत शिल्पा-राजच्या कारची धडक होता-होता राहिली, त्यामध्ये तीन लोक स्वार होते. हे तिघेजण एका खासगी इलेक्ट्रिक कंपनीत कामाला आहेत. तिघेही कंपनीच्या कामानिमित्ताने अमृतसरला गेले होते. तेथून परतत असताना वाटेत त्यांनी शिल्पाच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिल्पाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कारची तोडफोड केली आणि हा वाद निर्माण झाला. या संपूर्ण प्रकरणात हे तिघे जण मीडियापासून स्वतःचा बचाव करताना दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जालंधरमध्ये एका शोरुमचे उदघाटन करतानाची राज-शिल्पाची छायाचित्रे...