डिल साइन करताना राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष मोहित कंबोज
मुंबई: बी-टाऊनमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक वाद समोर येत आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हेही वादामध्ये अडकण्याच्या मार्गावर आहेत. आयपीएलच्या वादानंतर शिल्पा-राज यांची नवीन कंपनी सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड संबंधित नवीन वाद उभा राहिला आहे.
झाले असे, की काही महिन्यांपूर्वी शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या सतयुग गोल्ड कंपनीने इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडशी 25 कोटी रुपयांची डिल केली होती. परंतु अद्याप या दाम्पत्यने डिलनुसार पैसे जमा केलेले नाहीत. इंडियन बुलियनच्या प्रवक्त्याच्या सांगण्याप्रमाणे शिल्पा आणि राजने डिलच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच दोघांनी पेमेन्टच्या गोष्टींकडेही लक्ष दिलेले नाही. कंपनीने रिकव्हरीसाठी आता राज आणि शिल्पा यांना कायदेशीर नोटिस पाठवली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कायदेशीर नोटिसची प्रत...