आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty And Sushmita Sen Walks At Lakme Fashion Week

Lakme Fashion Weekमध्ये दिसला शिल्पा-सुश्मिताचा सुपरहॉट अंदाज, Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॅम्पवर शिल्पा शेट्टी आणि सुश्मिता सेन)
मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2014ला आजपासून सुरुवात झाली आहे. या इव्हेंटच्या पहिल्या दिवशी बॉलिवूडच्या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींनी रॅम्पवर चारचाँद लावले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सुश्मिता सेनने रॅम्पवर कॅटवॉक केला. दोन डिझायनर्सच्या शोच्या या दोघी शो स्टॉपर होत्या. मंगळवारपासून सुरु झालेला हा इव्हेंट 24 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीने डिझायनर मसाबा गुप्तासाठी रॅम्पवॉक केला. तिने यावेळी मसाबाने डिझाइन केलेला सुंदर ड्रेस परिधान केला होता. तिच्या ड्रेसवर प्लेट आणि स्पूनचे डिझाइन होते.
सुश्मिता सेन
अभिनेत्री सुश्मिता सेन ब-याच दिवसांनी मीडियासमोर आली. ब्लॅक कलरच्या डिझायनर गाउनमध्ये सुश्मिता रॅम्पवर अवतरली होती. डिझायनर अमित अग्रवालने तिच्यासाठी हा ड्रेस डिझाइन केला होता. तिचा हा ड्रेस मागील बाजूने पारदर्शक होता.
या इव्हेंटनंतर शिल्पा आणि सुश्मिताने पत्रकारपरिषद संबोधित केली. या पत्रकारपरिषदेत डिझायनर मसाबा गुप्ता आणि अमित अग्रवालसुद्धा सहभागी झाले होते. दोघी अभिनेत्री यावेळी कूल दिसल्या. दोघींनी फोटोग्राफर्सना एकत्र पोज दिल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...