आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : पती आणि मुलासह श्रीकृष्ण मंदिरात पोहोचली शिल्पा शेट्टी, इतर सेलेब्सही दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती राज कुंद्रा आणि मुलगा वियानसह शिल्पा शेट्टी)
मुंबई - गोकुळाष्टमीचा सण देशभरात उत्साहात साजरा होतोय. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा हा सण उत्साहात साजरा करत आहेत. मुंबईतील जुहूस्थित हरे कृष्ण मंदिरात रविवारी बरेच सेलिब्रिटी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. या मंदिरात अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि मुलगा वियानसह श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती.
या तिघांनी मिळून श्रीकृष्णाची पूजाअर्चा केली आणि वियानने श्रीकृष्णाला झोकासुद्धा दिला. शिल्पासह अभिनेता विवेक ओबरॉयसुद्धा आपल्या पत्नी आणि मुलासह या मंदिरात पोहोचला होता. यावेळी विवेकची पत्नी प्रियांका आणि मुलगा वियान पारंपरिक कपड्यांमध्ये दिसले.
अदालत या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता रोनित रॉय पत्नी नीलम आणि भाऊ रोहित रॉयसह श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी पोहोचला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...