आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: रिचर्ड गेरेच्या KISSने प्रसिध्द झाली शिल्पा, राज कुंद्रासह अडकली लग्नगाठीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पाचा जन्म 8 जून 1975 रोजी मंगळोरमध्ये झाला. बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास निश्चित करणारी शिल्पा 22 नोव्हेंबर 2009मध्ये उद्योगपती राज कुंद्रासह लग्नगाठीत अडकली. त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली असून त्यांना वियान नावाचा एक मुलगा आहे.
शिल्पाने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात 1993मध्ये आलेल्या 'बाजीगर' सिनेमामधून केली. 1994मध्ये तिने अक्षय कुमारसोबत 'मै खिलाडी तू अनाडी'मध्ये काम केले. पुन्हा 1994मध्येच आलेल्या 'आग' सिनेमात शिल्पाने उत्कृष्ट अभियन केला. तिचा 'आओ प्यार करे' हा सिनेमासुध्दा 1994मध्येच रिलीज झाला.
'बिग ब्रदर'दरम्यान जेड गुडीने कथित रुपात अश्लिल टिका केली होती. त्यानंतर शिल्पा या टीव्ही शोची विजेती ठरली आणि त्यानंतर ही अभिनेत्री सर्वाधिक चर्चेत आली. या शोमध्ये जेड गुडीच्या वक्तव्यामुळे जगभरात टिका झाली होती. 2007मध्ये एका इव्हेंटदरम्यान हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले होते. या घटनेने बराच वाद उभा राहिला होता. परंतु शिल्पाला खूपच लोकप्रियता मिळाली.
राज कुंद्रासह अडकली लग्नगाठीत
शिल्पा-राज यांचे लग्न 22 नोव्हेंबर 2009रोजी झाले. शिल्पाने आपल्या लग्नाची रिसेप्शन पार्टी मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये दिली होती. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज आणि प्रसिध्द स्टार्स उपस्थित होते. पार्टीमध्ये मोनिका बेदी, मान्यता दत्त, संजय दत्त,सुध्दा सामील होते. माधनव आपल्या पत्नीसह पार्टीत पोहोचला होता. जुही चावला पतीसह दिसली होती. या सर्व स्टार्ससह बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसुध्दा पार्टीत पोहोचला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा राज कुंद्रासह शिल्पा शेट्टीची निवडक छायाचित्रे...