आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टी घेणार नाही ‘ब्रेक’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आई होणार आहे; पण ती ऐश्वर्यासारखा ब्रेक घेणार नाही. लोहडीच्या दिवशी एका पार्टीत शिल्पाने सांगितले की, ती अशा दिवसांत आराम करण्याऐवजी आपले अपूर्ण काम पूर्ण करणार आहे. भाग्यावर विश्वास ठेवणारी शिल्पा वेळेला आणि तारखांना जास्त महत्त्व देते. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तयार होत असलेल्या ‘ढिश्क्यांऊ’ या चित्रपटाचा मुहूर्त तिने मकर संक्रांतीच्या दिवशी केला. विशेष म्हणजे सेटवर जाऊन तिने कॅमेरा सांभाळला आणि चित्रपटाचा श्रीगणेशा केला. याचप्रमाणे शिल्पा आणि राज कुंद्रा संजय दत्तच्या स्पोर्ट्स लीगशीसुद्धा जोडले आहेत. या प्रकल्पाचे कामदेखील ती लवकरच सुरू करणार आहे.