आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day :छायाचित्रांमध्ये पाहा बालपणीपासून ते आतापर्यंत किती बदलली शिल्पा शेट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आज 39 वर्षांची झाली आहे. 8 जून 1975 रोजी शिल्पाचा मंगळोर, कर्नाटक येथे जन्म झाला. शिल्पा आज एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच तिला उद्योगपती महिला म्हणूनसुध्दा संबोधले जाते. तिने आपल्या करिअरची सुरूवात एक मॉडेल म्हणून केली होती. तेव्हा तिचे वय केवळ 16 वर्षे होते. 1991मध्ये तिने पहिल्यांदा लिम्का ब्राँडसाठी मॉडेलिंग केले होते.
तिने हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडीमध्ये जवळपास 40 सिनेमे केले आहेत. तिने 1993मध्ये आलेल्या शाहरुख खान आणि काजोल अभिनीत 'बाजीगर' सिनेमापासून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून 'आग' हा तिचा पहिला सिनेमा होता. 'धड़कन' (2000), 'रिश्ते' (2002) आणि 'फिर मिलेंगे' (2004)सारख्या सिनेमांमधील तिच्या अभिनयांची बरीच प्रशंसा झाली. 2009मध्ये ती उद्योगपती राज कुंद्रासह लग्गगाठीत अडकली.
शिल्पा आज बॉलिवूमध्ये आणि उद्योगजगात एक सुप्रसिध्द महिला म्हणून ओळखली जाते. मात्र 90च्या दशकातील आणि 2000नंतरची छायाचित्रे तिचे दोन चेहरे दाखवतात. सांगितले जाते, की सिनेमांमध्ये यशस्वी होण्यासाठी शिल्पाने प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिने एकदा नव्हे तर दोनदा प्लास्टिक सर्जरी करून आपल्या नाकाचा आकार बदलला आहे. परंतु यात कितपत सत्यता आहे शिल्पालाच ठाऊक. असेही म्हटले जाते होते, की प्लास्टिक सर्जरीने शिल्पाचा लूकच नव्हे तर तिच्या बुडत्या करिअरलासुध्दा आधार मिळाला.
असो, या तर प्लास्टिक सर्जरीनंतर आलेल्या बदलाच्या गोष्टी आहेत. परंतु शिल्पाची काही छायाचित्रे बघितली तर जाणवते, की बालपणापासून ते आतापर्यंत तिच्यात बराच बदल झाला आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तिच्या बालपणीची छायाचित्रे दाखवणार आहोत. ती बघून तुम्हीच अंदाजा बांधा शिल्पाने प्लास्टिक सर्जरी केली आहे की नाही... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा शिल्पाची बालपणीपासूनची आतापर्यंतची छायाचित्रे...