आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस चेन, टीव्ही शोसह शिल्पाची नवी इनिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटात परतण्याच्या ऐवजी शिल्पा शेट्टी कुंद्रा उद्योजिका म्हणून स्वत:ला तयार करत आहे. आपल्या बॅनरचा ‘ढिश्क्यांऊ’ हा पहिला चित्रपट 28 मार्च रोजी प्रदर्शित केल्यानंतर ती निर्मिती आणि फिटनेसच्या क्षेत्राकडे वळणार आहे.
एकेकाळी फिटनेस आयकॉन बनलेली शिल्पा शेट्टी कुंद्राची फिटनेस चेन एप्रिलमध्ये सुरू होत आहे. शिल्पा व तिचा पती राज कुंद्राने हरमन बावेजा आणि सनी देओल अभिनीत ‘ढिश्क्यांऊ’ चित्रपट बनवला, जो या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. आता चित्रपटांसोबत तिचे प्रॉडक्शन हाऊस छोट्या पडद्यासाठी शो बनवण्याची तयारी करत आहे.
शिल्पाचा अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्याचा सध्यातरी विचार नाही. शिल्पाला याबाबत विचारले असता तिने सांगितले की, ‘2009 मध्ये विवाह केल्यानंतर मी एक उद्योजिका म्हणून स्वत:ला तयार केले आहे. मी आपली स्पा चेन सुरू केली आणि काही ब्रँड्सशी जोडली गेली आहे. ज्यांची स्क्रिप्ट दमदार असेल असे चित्रपट मी आता करू इच्छिते आणि त्यासारखी भूमिका मी यापूर्वी कधी साकारली नसावी. लोकांशी माझी ओळख ही टेलिव्हिजनमुळे तयार झाली आहे. आपल्या मुलाला भरपूर वेळ देण्यासाठी मला टीव्ही रिअँलिटी शो करणे योग्य वाटतात.’
एप्रिलमध्ये सुरू होणार्‍या आपल्या फिटनेस चेनला मोठय़ा पातळीवर नेण्यासोबतच ‘ढिश्क्यांऊ’ चित्रपटानंतर शिल्पाचे बॅनर टीव्हीवरील एका शोची निर्मिती करणार आहे. त्यानंतर लव्ह स्टोरीवर आधारित एक चित्रपट बनवण्याची तिची तयारी आहे. पती राज कुंद्रानेदेखील इच्छा व्यक्त केली की र्शीदेवीच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटाप्रमाणे शिल्पानेदेखील मुख्य भूमिका करावी. सूत्रांनुसार शिल्पाच्या फिटनेस ब्रँडला अधिक विकसित करण्याचा राज कुंद्रा यांच्या डोक्यामध्ये विचार आहे.