आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांचा झाला शिल्पा-राजचा मुलगा, पाहा कोणकोण पोहोचले शुभेच्छा द्यायला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री, निर्माती आणि बिझनेसवुमन शिल्पा शेट्टी कुंद्राने बुधवारी रात्री आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. राज आणि शिल्पाचा मुलगा
वियानचा हा दुसरा वाढदिवस होता. या बर्थडे पार्टीत अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
पार्टीत मान्यता दत्त आपल्या जुळ्या मुलांसह सहभागी झाली होती. याशिवाय निलम कोठारी, मलायका अरोरा खान, हरमन बावेजा, गायत्री जोशी, विवेक ओबरॉय, गणेश हेगडे, महीप कपूरसह बरेच सेलेब्स वियानला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. मलायका तिचा मुलगा अरहानसोबत पार्टीत दिसली.
वियानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे वडील राज कुंद्रा यांनी वियानचे छायाचित्र असलेले एक मोठे फ्लेक्स प्रवेशद्वाराजवळ लावले होते. त्यावर 'कुंद्रा स्टाइल' असे लिहिले होते.
राज कुंद्रा यांनी वियानसोबतचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर करुन ट्विट केले, "हॅपी बर्थडे! आज माझा मुलगा दोन वर्षांचा झाला. मला खूप अभिमान वाटतोय, त्यामुळे मी आपल्या मुलासोबतचे छायाचित्र शेअर करत आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा वियानच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची झलक...