आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: ज्वेलरी स्टोर लाँचिंग निमित्त शिल्पाने दिली जंगी पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी आयपीएल फ्रेंचायजी टीमची को-ऑनर, निर्मातीनंतर आता बिझनेस वुमनसुद्धा बनली आहे. अलीकडेच तिने पती राज कुंद्रासह मिळून सोन्याच्या दागिन्यांचा बिझनेस सुरु केला आहे. शिल्पाने सतयुग गोल्ड नावाने एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीची अध्यक्ष स्वतः शिल्पा शेट्टी आहे.
या कंपनीच्या सात ब्रांच मुंबई, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, पुणे, चंदीगड आणि लुधियाना या शहरांत सुरु होणार आहेत. कंपनी ओपनिंगच्या निमित्ताने शिल्पा आणि राजने मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते.
यावेळी शिल्पा म्हणाली, ''माझे स्वप्न सत्यात उतरले, याचा मला खूप आनंद वाटतोय. मला सोन्याची खूप आवड आहे. आणि आता आमची कंपनी आपल्या दागिन्यांनी ग्राहकांना संतुष्ट करणार आहे.''
ग्रॅण्ड हयात मध्ये आयोजित पार्टीत शिल्पा आणि राजच्या कुटुंबीयांसह अनेक मित्र सहभागी झाले होते. यामध्ये रवीना टंडन, हरमन बावेजा, मानसी रॉय, गुलशन ग्रोवर, आर. माधवन, गीता बसरा, उर्वशी यांचा समावेश होता.
पुढे क्लिक करा आणि पाहा शिल्पा-राजच्या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...