आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shukla In Relationship With B.A. Pass Director Ajay Bahl?

शाहरुखसह झळकलेल्या या अभिनेत्रीने सोडले नव-याचे घर, दिग्दर्शकासोबत जुळले सूत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'चक दे! इंडिया', 'बी.ए. पास', 'भिंडी बाजार' या सिनेमांमध्ये झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शुक्ला सध्या चर्चेत आहे. 'बी.ए. पास'चे दिग्दर्शक अजय बहलसोबतच्या रिलेशनशिपमुळे शिल्पा चर्चेत आली आहे. दोघांमध्ये मैत्रीपलिकडचे नाते असल्याचे ऐकिवात आहे. दिग्दर्शकासोबत सूत जुळल्यामुळे शिल्पाने तिचे पती मोहित त्रिपाठीचे घर सोडले असून आता ती वेगळी राहात आहे.
याविषयी शिल्पाचे म्हणणे आहे, "मी आणि मोहितने यापुढे मित्रांप्रमाणे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी मोहितसोबत राहात नाही. मी मुंबईत आणि मोहित दिल्लीत राहातो. घटस्फोटाविषयी सांगायचे झाल्यास, काही कागदपत्रे आमचे वैवाहिक आयुष्य ठरवू शकत नाहीत. मी आणि मोहित एकत्र असताना एकमेकांना भरपूर वेळ द्यायचो. मी माझ्या निर्णयामुळे आनंदी आहे. कारण लग्नाचा आज एक नवीन अर्थ मला गवसला आहे."
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा मोहितसोबत घराच्या चार भिंतीत राहू इच्छित नव्हती. हे तिच्या सासू-सास-यांनादेखील ठाऊक होते. शिल्पाने म्हणते, "माझ्या आणि मोहितमध्ये कोणतीही कटुता नाहीये." अजय बहल यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी शिल्पाला विचारले असता, ती म्हणाली ''आमच्या नात्याला मी कोणतेही लेबल लावू इच्छित नाही. एका सिनेमात काम करत असताना तेथील सर्व लोक एका कुटुंबाप्रमाणे राहतात. अजयला मी ब-याच वर्षांपासून ओळखते आणि त्याच्यासोबत वेळ घालवणे मला पसंत आहे."
कोण आहे शिल्पा शुक्ला?
'बी.ए. पास' या सिनेमानंतर बोल्ड आणि सेक्सी अभिनेत्री म्हणून शिल्पाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिल्पाचा जन्म 22 फेब्रुवारी 1982 रोजी बिहारमधील वैशालीमध्ये झाला. न्यू दिल्ली, कोलकाता आणि गुजरातमध्ये ती लहानाची मोठी झाली. तिने आर.के. पुरम दिल्ली पब्लिक स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यूनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीतून पुढील शिक्षण घेतले. रैना थिएटरपासून तिने अभिनयाला सुरुवात केली. 2003 मध्ये 'खामोश पानी' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2013 मध्ये आलेल्या 'बी.ए. पास' या सिनेमासाठी शिल्पाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला आहे.
गाजलेल्या भूमिका...
चक दे! इंडियाः 2007 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर चक दे! इंडिया या सिनेमात शिल्पाने बिंदिया हे पात्र साकारले होते. बिंदिया महिला हॉकी टीममधील सिनिअर खेळाडू असते. ती ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पिअन बनण्यात मदत करते.
बी.ए. पासः 2013मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात शिल्पा बोल्ड रुपात झळकली होती. सिनेमातील तिने साकारलेल्या पात्राचे नाव सारिका होते, जी एक इरॉटिक हाऊस वाईफ असते.. तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवून ती त्याचा वापर करुन घेते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शिल्पाची निवडक छायाचित्रे...