आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shukla May Be Sujoy Ghosh’s Durga Rani Singh

PICS: 'बीए पास'ची बोल्ड शिल्पा सुजॉय घोषच्या सिनेमातून बदलणार इमेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'बीएस पास'ची बोल्ड नायिका शिल्पा शुक्ला आता नवीन ओळख निर्माण करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी तिला एक नवीन भूमिका मिळाली आहे. दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी शिल्पाला 'दुर्गा रानी सिंह' सिनेमाचे पात्र ऑफर केले आहे. त्यांना या सिनेमाच्या नायिकेची ब-याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. त्यासाठी त्यांनी विद्या बालन, करीना कपूर यांना पटकथा वाचून दाखवली मात्र त्यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला.
'कहानी' सिनेमाप्रमाणेच हा एक थ्रिलर आणि नायिकाप्रधान सिनेमा आहे. याचे शूटिंग कोलकातामध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, शिल्पाच्या होकाराने त्यांनी आता सिनेमासाठी नायिकांचा शोध थांबवला आहे. शिल्पा आता या सिनेमाकडून अपेक्षा बाळगायला लागली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बीए पास' सिनेमात शिल्पा शुक्ला कशी दिसली बोल्ड लूकमध्ये...