आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa's Pretty Stylish Show On Ramp With Harman Ayesha

WLIFW: रॅम्पवर शिल्पाचा दिलखेचक अंदाज, हरमान-आएशा दिसले सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती शिल्पा शेट्टी-कुंद्रा विल्स लाइफ स्टाइल फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी सहभागी झाली होती. या इवेंटमध्ये शिल्पाचा नवा अंदाज उपस्थितांच्या पसंतीला पडला. रॅम्पवर अवतरलेल्या शिल्पाच्या सौंदर्य आणि अदांनी या इवेंटला चारचाँद लावले.
डिझायनर तरुण तहलियानी यांनी डिझाइन केलेला लहंगा-चोली परिधान करुन शिल्पा रॅम्पवर अवतरली होती. मरुन-ऑरेंज कलरच्या लहंगा-चोलीत शिल्पा कमालीची सुंदर दिसली. शिल्पाने यावर गोल्डन ज्वेलरी घातली होती.
रॅम्पवर शिल्पासह ‘ढिश्कियाऊं’ सिनेमातील स्टार आएशा खन्ना आणि हरमन बावेजासुद्धा दिसले. यावेळी हरमन आणि आएशाने ब्लॅक कलरचे डिझायनर ड्रेस परिधान केले होते.
शिल्पा दोन वर्षीय मुलाची आई आहे. मात्र तिच्यासमोर रॅम्पवरील इतर मॉडेल्स अंदाज फिका वाटला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विल्स लाइफ स्टाइल फॅशन वीकची खास छायाचित्रे...