आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooting Photos Of Kapil Sharma\'s Kis Kisko Pyar Karu Movie

PHOTOS: कपिलने नायिकेसोबत वाळवंटात केला रोमान्स, उंटावरून केली सैर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- विनोदवीर कपिल शर्माचा 'किस-किस को प्यार करू' या पहिल्या सिनेमाचे सीन्स खींवसरच्या वाळवंटात चित्रीत केले जात आहेत. दिग्दर्शक अब्बास-मस्तानीच्या या सिनेमात काही शूटिंग मंडोर आणि पंचकुंडाच्या छतरियामध्ये करण्यात आली. रेडी, कॅमेरा आणि अॅक्शन म्हणताच सिनेमाचे शुटिंग सुरु झाले. यावेळी एका गाण्याचे शूटिंग केले गेले. यामध्ये कपिल कुर्ता-पायजमा परिधान करून उंटावरून खाली उतरला.
उंटावर स्वार झालेली अभिनेत्री सई लोकुर गाणे गुनगुनत होती. यावेळी लगेच एक सीन कट म्हणून थांबण्यात आला. सीन पुन्हा चित्रीत करण्यात आला. सिनेमात कपिल शर्मा अभिनेत्री एली अवराम, सई लोकुर आणि मंजरी फडणीससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अब्बास-मस्तानी प्रॉडक्शनचे राजस्थान, को-ऑर्डिनेटर जय कुमार, लोकल को-ऑर्डिनेटर मुख्तियार आणि आनंद यांनी सांगितले, जोधपूरनंतर सिनेमाचे शूटिंग अजमेरमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्याच्या सीनची काही छायाचित्रे...