मुंबईः शुक्रवारी 7 नोव्हेंबरला
अक्षय कुमारचा 'द शौकीन्स' हा सिनेमा सिल्व्हर स्क्रिनवर दाखल होतोय. यावर्षी रिलीज होणारा अक्षयचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याचे रिलीज झालेले 'हॉलिडे' आणि 'एन्टरटेन्मेंट' हे दोन्ही सिनेमा
बॉक्स ऑफिसवरवर यशस्वी ठरले. 'द शौकीन्स'च्या माध्यमातून अक्षय यावर्षीची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहे.
'द शौकीन्स' या सिनेमाची कथा 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'शौकीन' या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर आहे. या सिनेमाची नायिका लीसा हेडनच्या मते, जुन्या आणि नवीन सिनेमात केवळ एकच साम्य आहे, ते म्हणजे तीन 'शौकीन्स' म्हातारे एका मुलीच्या मागे लागतात. त्यानंतरची संपूर्ण कथा वेगळी आहे. या सिनेमात अक्षय आणि लीसासह अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पीयुष मिश्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
दिल्ली, मुंबईपासून ते मॉरिशस आणि थायलँडमध्ये झाले शूटिंग
या सिनेमात दारुच्या आहारी गेलेल्या सुपरस्टारची भूमिका या सिनेमात अक्षयने साकारली आहे. या सिनेमात प्रेश्रकांना अनेक सूंदर लोकेशन्स बघायला मिळणार आहेत. सिनेमाचे शूटिंग मुंबई आणि दिल्लीसोबतच मॉरिशस आणि थायलँडमध्ये झाले आहे. येथील सुंदर बीच आणि नयनरम्य दृश्य मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगवेळी सर्व स्टार्सनी भरपूर धमाल-मस्ती केली. सिनेमाच्या ऑन लोकेशन छायाचित्रांवरुन याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'द शौकीन्स'ची ऑन लोकेशन छायाचित्रे...