आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha And Shahid Get Touchy Feely At Haider Promotions

धमाल-मस्ती आणि डान्ससह शाहिद-श्रध्दाने केले सिनेमाचे प्रमोशन, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात श्रध्दा कपूर आणि शाहिद कपूर मस्ती करताना आणि दुस-या छायाचित्रात डान्स करताना श्रध्दा)
मुंबई: शाहिद कपूरने 'हैदर' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली आहे. ते स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबईच्या उमंग कॉलेजमधील फेस्टिव्हलमध्ये सामील झाले होते.
या इव्हेंटमध्ये शाहिद-श्रध्दा मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले. दोघांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह डान्सदेखील केला. अनेक सेल्फीदेखील काढले. दोघांनी चाहत्यांना ऑटोग्राफसुध्दा दिला.
इव्हेंटमध्ये शाहिद काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला. तसेच, श्रध्दा पांढ-या रंगाचा टॉप आणि जान्समध्ये दिसून आली. इव्हेंटमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाजसुध्दा पोहोचले होते.
'हैदर' येत्या 2 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. सिनेमात तब्बू आणि के के मेननसुध्दा दिसणार आहे. हा सिनेमा व्हिलिअम शेक्सपिअरच्या 'हेमलेट'वर आधारित आहे. सिनेमाचे एकुण बजेट 37 कोटींचे असून त्यामध्ये 22 कोटी प्रॉडक्शन आणि 15 कोटी प्रमोशनचे आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रमोशनसाठी कॉलेजमध्ये पोहोचलेल्या शाहिद-श्रध्दाची छायाचित्रे...