(बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूर)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूरचे सध्या नशीब फुलले आहे. 'आशिकी 2' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. त्यानंतर 'एक व्हिलेन'नेसुध्दा 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आणि आता 'हैदर'सुध्दा हिट झाला. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिल्यानंतर श्रध्दा बी-टाऊनची यशस्वी अभिनेत्री मानली जाऊ लागली आहे.
अलीकडेच, श्रध्दाला तिचे वडील शक्ती कपूर आणि भाऊ सिध्दान्त यांना स्पॉट करण्यात आले. विशेष म्हणजे श्रध्दाने 'हैदर'च्या यशानंतर नवीन मर्सडीज एसयूव्ही कार खरेदी केली आहे. नवीन कारमध्ये बसून श्रध्दा फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रध्दा आणि तिच्या नवीन कारचे Pics...