आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha Kapoor And Varun Dhawan Spotted After Their Practice For ABCD 2

वरुण-श्रध्दाने केली 'ABCD 2'साठी डान्सची प्रॅक्टिस, पाहा स्टुडिओमधून Outing केलेले Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन आणि श्रध्दा कपूर)
मुंबई: वरुण धवन आणि श्रध्दा कपूर शनिवारी (30 ऑगस्ट) एकत्र दिसले. दोघे रेमो डिसूझाच्या स्टुडिओच्या बाहेर दिसले होते. वरुण आणि श्रध्दाची जोडी डिसूझाच्या 'ABCD: एनी बडी कॅन डान्स 2'मध्ये एकत्र दिसणार आहे.
यावेळी श्रध्दा गुलाबी रंगाची लोअर आणि काळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसली. तिच्या डोक्यावर टोपी होती. तसेच, वरुण धवन शॉर्ट्स आणि काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. दोघे रेमो डिसूझाच्या स्टुडिओमध्ये प्रॅक्टिस करून बाहेर पडले. रेमो कोरिओग्राफरसह सिनेमा दिग्दर्शकसुध्दा आहे. आलिया भट्टसोबत 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा वरुणचा लास्ट रिलीज होता. तसेच, सिध्दार्थ मल्होत्रासोबतचा 'एक व्हिलेन' हा श्रध्दाचा लास्ट रिलीज होता.
'एबीसीडी 2'मध्ये प्रभूदेवा, लॉरेन आणि प्रतीक पाठकसुध्दा दिसणार आहेत. सिनेमाचा निर्माता सिध्दार्थ रॉय कपूर आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 26 जूनला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टुडिओमधून बाहेर पडलेला वरुण धवन आणि श्रध्दा कपूर यांची छायाचित्रे...