कोयला राणा आणि श्रध्दा कपूर
नवी दिल्ली: 'आशिकी 2' आणि 'एक व्हिलन' फेम बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूर काल (19 जुलै) नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये पोहोचली. तिने इथे चालू असलेल्या गौरव गुप्ताच्या इंडिया कल्चर वीक- 2014मध्ये सहभाग नोंदवला. यादरम्यान तिने गौरवने डिझाइन केलेले कपडे परिधान करून रॅम्प वॉक केला.
शनिवारी (19 जुलै) शोचा तिसरा दिवस होता. त्यामध्ये श्रध्दाव्यतिरिक्त मिस इंडिया- 2014 कोयल राणा, अभिनेता राहूल खन्ना, मॉडेल अर्चना एरिका, बीनल, लक्ष्मी राणा, श्रष्टि राणा, कनिका देव, कृष्णा सोमानी, सना, कनिष्ठा आणि पिया त्रिवेदीनेसुध्दा गौरवसाठी रॅम्प वॉक केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इंडिया कल्चर वीक- 2014मध्ये पोहोचलेल्या सेलेब्सच्या कॅटवॉकची छायाचित्रे...