आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha Kapoor At The Launch Of Rohit Bal Collection For Jabong

रोहित बलसाठी रॅम्पवर अवतरली श्रद्धा कपूर, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 15 एप्रिल रोजी डिझायनर रोहित बलचे कलेक्शन सादर केले. रोहितने आपले हे नवीन कलेक्शन जबॉन्गसाठी लाँच केले. लाँच इवेंटमध्ये श्रद्धा व्हाइट ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसली. श्रद्धाने यावेळी रोहित बलचे 48 ऑनलाइन प्रेट कलेक्शन लाँच केले. हे कलेक्शन जबॉन्ग या शॉपिंग पोर्टल ऑनलाइवरुन खरेदी केले जाऊ शकतील.
श्रद्धासोबत अनेक मॉडेल्ससुद्धा कलेक्शन सादर करण्यासाठी रॅम्पवर अवतरले होते. रोहितचे हे कलेक्शन ट्रेडिशन आहे. श्रद्धा या शोची शोस्टॉपर होती.
याकाळात श्रद्धा आपल्या आगामी तीन सिनेमांच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. यावर्षी तिचे तीन सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत.
2014 मध्ये रिलीज होणारे श्रद्धाचे सिनेमे -
एक व्हिलन -
'एक व्हिलन' हा रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा श्रद्धासह स्क्रिन शेअर करणार आहे. मोहित सुरी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. येत्या 27 जूनला सिनेमा रिलीज होणार आहे.
हैदर -
विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'हैदर' या सिनेमात श्रद्धा रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. या सिनेमात शाहिद कपूर तिचा हीरो आहे. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
उंगली -
करण जौहर निर्मित आणि रेंसिल डिसिल्वा दिग्दर्शित 'उंगली' हा कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. या सिनेमात श्रद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. उंगलीमध्ये इमरान हाश्मी आणि कंगना राणावत मेन लीडमध्ये आहेत. 7 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा रोहित बालच्या नवीन कलेक्शन लाँचची खास छायाचित्रे...