आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुटिंगदरम्यान बाईक चालवताना जखमी झाली श्रध्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूरच्या 'एक व्हिलेन' सिनेमाची शुटिंगदरम्यान श्रध्दा कपूर बाईक चालवताना जखमी झाली आहे. ही शुटिंग मुंबईमध्ये चालू होती. सीन चित्रीत करण्यापूर्वी श्रध्दाला बाईक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु बाईक चालवताना तिचे अचानक नियंत्रण सुटले आणि तिच्या गुडघ्याला जखम झाली. ती या शुटिंगनंतर वरुण धवन, इलियाना डि-क्रूज आणि एकता कपूरसोबत 'मै तेरा हीरो'च्या सक्सेस पार्टीत जाणार होती.
जखमी झाल्यानंतर तिने टि्वट करून सांगितले, 'शुटिंगदरम्यान बाईक चालवताना जखमी झाल्याने वरुण धवनसोबत सक्सेस पार्टी सेलिब्रेट करू शकले नाही. आज पायाला थोडा आराम मिळाला आहे. हेल्मटमुळे माझ्या डोक्याला जखम झाली नाही.'