आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मफेअरच्या कव्हर पेजवर दिसणार श्रध्दाचे ग्लॅमर, पाहा लाँचिंग इव्हेंटचे Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फिल्मफअर'च्या कव्हर पेजच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये श्रध्दा कपूर)
मुंबई: 'आशिकी 2' आणि 'एक व्हिलेन'सारख्या हिट सिनेमांमधून लोकप्रिय झालेली श्रध्दा कपूर फिल्मफेअर मासिकाच्या सप्टेंबर अंकाच्या कव्हर पेजवर दिसत आहे. गुरुवारी (28 ऑगस्ट) प्रभादेवी, मुंबईमध्ये तिने मासिकाच्या या कव्हरचे अनावरण केले.
कव्हर पेजवर श्रध्दा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसून येत आहे. तिच्या या कव्हर पेजवर 'हॅलो हॉटी श्रध्दा कपूर स्टीम्स इट अप' असे लिहिलेला आहे. इव्हेंटदम्यान श्रध्दाने काळ्या रंगाचा टॉप आणि डिझाइनर आनंद भूषणनेव्दारा डिझाइन केलेला पांढ-या रंगाचे स्कर्ट परिधान केलेले होते.
श्रध्दा सध्या 'हैदर' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्येसुध्दा व्यस्त आहे. विशाल भारव्दाज दिग्दर्शित या सिनेमात तिच्यासह शाहिद कपूरसुध्दा दिसणार आहे. 2 ऑक्टोंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमधील श्रध्दाची खास छायाचित्रे...