(अभिनेत्री श्रद्धा कपूर)
मुंबई- अभिनेत्री श्रद्धा कपूरने गोल्डन गाऊन परिधान करुन डिझायनर केन फेरन्ससाठी रॅम्पवॉक केला. केन फेरन्सच्या या ड्रेसमध्ये श्रद्धा खूप ग्लॅमरस दिसली. मुंबईत आयोजित या इव्हेंटमध्ये श्रद्धाने 40 फूट उंच आयफिल टॉवरच्या प्रतिमेचे अनावरणसुद्धा केले.
या इव्हेंटमध्ये श्रद्धाने सांगितले, की पेरिस हे तिचे आवडते ठिकाण आहे. मीडियाशी बातचित करतान श्रद्धा म्हणाली, की अभिनेत्री
प्रियांका चोप्रासोबत पेरिसला जाण्याची तिची इच्छा आहे.
श्रद्धा सध्या रेमो डिसुजाच्या 'एबीसीडी 2' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तिच्यासह वरुण धवन मेन लीडमध्ये आहे. येत्या 19 जून रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढे पाहा, रॅम्पवॉक करतानाची श्रद्धा कपूरची छायाचित्रे...