आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रध्दा म्हणते, \'वडिलांना मारहाण होताना बघून मजा यायची\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील शक्ती कपूर यांना मोठ्या पडद्यावर मारहाण होत असताना श्रध्दा कपूरला कसे वाटत होते असे विचारले असता ती म्हणते, 'मला खूप मज्जा यायची. सिनेमात पापाला मार खाताना बघणे आणि त्यांना इतरांना मारताना बघताना मला खूप मज्जा यायची. मी तेव्हापासून सिनेमाची दिवानी झाली.'
हिंदी सिनेमामध्ये प्रसिध्द खलनायक शक्ती कपूर यांची मुलगी श्रध्दा कपूरने 'आशिकी 2'मधून चांगली लोकप्रियता मिळवली आहे. आता तिचा 'एक व्हिलेन' सिनेमा आज (27 जून) पडद्यावर झळकला आहे. या सिनेमानिमित्त माध्यमांसोबत बातचीत करताना श्रध्दाने बालपणीच्या काही गोष्टी शेअर केल्या.
पापाची भिती
पापा शक्ती कपूर खलनायकाच्या भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायचे त्यामुळे तिच्या मैत्रीणींच्या मनात एकप्रकारची भिती निर्माण झाली होती.
श्रध्दा सांगते, 'माझ्या मैत्रीणी घरी येण्यास खूप घाबरायच्या. त्यांना पापाची भिती वाटत होती. मी त्यांना समजवायचे अरे ते सिनेमात जरी खलनायक असले तरी ख-या आयुष्यात तसे नाहीत.'
श्रध्दाच्या सांगण्याप्रमाणे, तिच्या मैत्रीणी पापा शक्ती कपूर यांना भेटल्यानंतर त्यांच्या मनातील भिती दूर झाली. त्या सर्व शक्ती कपूर यांच्या चाहत्या झाल्या.
स्वत:ला श्रेय
फिल्मी बॅकराउंड घेऊन बॉलिवूडमध्ये आलेली श्रध्दा मिळेलेल्या यशाबद्दल स्वत:ची पाठ थोपटते. तसेच इंडस्ट्रीमध्ये आलेले नवीन चेह-यांची वरुण धवन, आलिया भट्ट, अर्जुन कपूरची प्रशंसा करताना श्रध्दा थकत नाही. हे सर्व फिल्मी बॅकराउंडमधून आले असले तरी त्यांनी त्यांच्या कौशल्यावर यश मिळवले आहे. या सर्वांनी सुपरस्टार्सना आव्हान दिले आहे.