आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रध्दाने GQ मासिकासाठी केले फोटोशूट, नवीन अवतार बघून सर्वच झाले दंग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रध्दा कपूर
मुंबई: श्रध्दा कपूर सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, श्रध्दाचा 'एक व्हिलन' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे आणि दुसरे म्हणेज, श्रध्दाने अलीकडेच, GQ मासिकासाठी फोटोशूट केले आहे. तिने हे नवीन फोटोशूट करून सर्वांना अचंबित केले आहे. कारण ती खूपच वेगळ्या आणि हटके अंदाजात दिसत आहे.
'एक व्हिलन'च्या सुपर सक्सेस पार्टीच्या प्रेस नोटमध्ये श्रध्दाचे फोटोग्राफर्सने बायकॉट केले होते.
श्रध्दाच्या अनफ्रेंडली वागणुकिमुळे तिला बायकॉट करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये दिग्दर्शक मोहित सूरी स्टेज आल्यानंतर त्याने फोटो सेशनसाठी सिनेमाच्या टीमला बोलावले तेव्हा त्याने स्वत:च्या हातात कॅमेरा घेतला. मात्र त्याने श्रध्दाला शुट करण्यास सरळ नकार दिला.
यावेळी सिध्दार्थने फोटोग्राफर्सना विनंती केली, हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे माझ्या को-स्टारसह फोटो काढायचा आहे. मात्र तिथे उपस्थित एका फोटोग्राफरने सिध्दार्थला श्रध्दासह फोटो क्लिक करण्यास नकार दिला. फोटोग्राफर्सने श्रध्दाचे बायकॉट केले मात्र याचा किंचितच परिणाम श्रध्दावर झाला असावा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा GQ मासिकासाठी श्रध्दाने केलेले फोटोशूटचे 7 निवडक PICS...