आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रध्दाची उडवली खिल्ली, 'पाकिस्तानी मीडिया'ने शॉर्ट्सच्या खाली घातली लेगिंग्स!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिध्दार्थ मल्होत्रा, श्रध्दा कपूर आणि मोहित सूरी, एक छायाचित्रात श्रध्दा कपूर शॉर्ट्समध्ये दिसत आहे. तसेच, दुस-या छायाचित्रात पाकिस्तानच्या एका वर्तमानपत्रात एडिट केलेले एक छायाचित्रात श्रध्दाने शॉर्ट्स खाली लेगिंग्स परिधान केलेली दिसत आहे.
मुंबई: श्रध्दा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु यावेळी ती भारतात नव्हे तर चक्क पाकिस्तानमध्ये चर्चेत आली आहे. श्रध्दा कपूर तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. पण पाकिस्तानमध्ये तिच्या बिनधास्त अंदाजाची खिल्ली उडवली जातेय. भारतात श्रध्दा सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही ड्रेसमध्ये पोहोचली तरी काही हरकत नाही. परंतु पाकिस्तानच्या बाबतीत तसे नाहीये.
झाले असे, की पाकिस्तानच्या 'डेली मशरीक' या दैनिकाने श्रध्दाच्या 'एक व्हिलन'च्या प्रमोशनची बातमी प्रकाशित करण्यासाठी फोटोला एडिट करून तिने परिधान केलेल्या शॉर्ट्सच्या खाली काळ्या रंगाची लेगिंग्स घातली. आता हे छायाचित्र श्रध्दाची खिल्ली उडवण्यासाठी पुरेसे आहे. जे छायाचित्रे एडिट करण्यात ते छायाचित्र 21 मे रोजी मुंबईमध्ये झालेल्या 91.1 FM. Radio Cityच्या एका इव्हेंटमध्ये काढण्यात आले होते. यावेळी श्रध्दा दिग्दर्शक मोहित सूरी आणि अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रासह उपस्थित होती. श्रध्दाच्या या छायाचित्राची पाकिस्तानी मीडियामध्ये बरीच खिल्ली उडवली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रध्दा कपूरच्या याच इव्हेंटची इतर छायाचित्रे...