आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan See 'haider' And Shradha Kapoor 'bang Bang'

PIX: हृतिकने आईसोबत बघितला 'हैदर' तर 'बँग बँग' बघायला पोहोचली श्रद्धा कपूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात हृतिक रोशन आई पिंकीसोबत, दुस-या छायाचित्रात श्रद्धा कपूर)
मुंबईः बॉक्स ऑफिसवर 2 ऑक्टोबर रोजी हृतिक रोशन स्टारर 'बँग बँग' आणि शाहिद कपूरचा 'हैदर' हे दोन सिनेमे रिलीज झाले. 'बँग बँग'ला धमाकेदार तर 'हैदर'ला पहिल्या दिवशी ठिकठाक ओपनिंग मिळाले. गुरुवारी या सिनेमातील स्टार्स एकमेकांचा सिनेमा बघायला जुहूस्थित पीव्हीआर मल्टीप्लेक्समध्ये पोहोचले होते. एकीकडे हृतिकने 'हैदर' तर श्रद्धा कपूरने 'बँग बँग' हा सिनेमा बघितला.
हृतिक आई पिंकीसोबत सिनेमा बघायला पोहोचला होता. तो ब्राउन ट्राउजर आणि ब्लॅक टी शर्टमध्ये दिसला. तर त्याची आई पिंकी रोशन या कॅज्युअल लूकमध्ये दिसल्या. बँग बँग बघायला पोहोचलेली श्रद्धासुद्धा यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. व्हाइट टॉप आणि पिंक लोअर, डेनिम जॅकेटमध्ये ती कूल दिसली.
यावेळी बी टाऊनमधील इतर सेलेब्ससुद्धा पीव्हीआरमध्ये पोहोचले होते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, अर्जुन कपूर, ऋचा चड्ढा, पद्ममिनी कोल्हापुरे, मोहित मारवाह, अंशुला कपूर, गिरीश कुमार येथे पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलेब्सची क्लिक झालेली छायाचित्रे...