मुंबई: आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल गुरुवारी लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड शिलादित्य मुखोपाध्यायशी श्रेयाने लग्न केले. अगदी खासगी समारंभात कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत श्रेया आणि शिलादित्य लग्नाच्या गाठीत अडकले. लग्न झाल्याची माहिती स्वतः श्रेयाने
ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना दिली आहे. बंगाली पद्धतीने त्यांचे लग्न झाले.
शिलादित्य हिपकॅस्क.कॉमचा सर्वेसर्वा आहे. गेल्या वर्षी शिलादित्यने श्रेयाला प्रपोज केलं होतं आणि श्रेयाने लगेच होकार कळवला होता.