आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shreyas Talpade's Marathi Film Will Be Released In 2015

श्रेयस तळपदे मराठीत घेऊन येतोय ‘बाजी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुखचे ‘लय भारी’द्वारे मराठी सिनेमातील पदार्पण यशस्वी ठरले आहे. आता श्रेयस तळपदे देखील सुपरहीरो म्हणून ‘बाजी’ या मराठी सिनेमाद्वारे सक्रिय होत आहे.
नागेश कुकुनूरच्या ‘डोर’द्वारे हिंदी सिनेमामध्ये ओळख निर्माण केलेल्या श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून प्रवेश केला. श्रेयसचा ‘पोश्टर बॉयज’ हा पहिला सिनेमा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय तो ‘बाजी’या पहिल्या सुपरहीरो मराठी सिनेमात अभिनेता म्हणून काम करत आहे. सिनेमाचे 40 टक्के शुटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित शुटिंगचे शेड्यूल ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. श्रेयस सिनेमाला हिंदी सबटायटल्ससोबत पुढच्या वर्षी प्रदर्शित करण्याची तयारी करत आहे.
यावर्षीच्या सर्व महत्त्वाच्या तारखा फूल आहेत आणि वर्षाच्या शेवटी तर दिग्गज सिनेतार्‍यांचे सिनेमा प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे श्रेयसने 2015 मध्ये ‘बाजी’चे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमादिवशी अन्य सिनेमा प्रदर्शित होणार नाही, याची काळजी श्रेयस घेणार आहे. रितेशच्या ‘लय भारी’नंतर श्रेयसचा ‘बाजी’मराठी सिनेमात कितपत बाजी मारतो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.