Home | Off Screen | Shridevi and Amitabh Bachchan Team up again

24 वर्षांनंतर श्रीदेवी-अमिताभ दिसणार सोबत

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Nov 25, 2014, 04:49 PM IST

'खुदा गवाह'मध्ये श्रीदेवी-अमिताभ बच्चन सोबत दिसले होते. दोघांच्या सोबतच्या भूमिकेचा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

  • Shridevi and Amitabh Bachchan Team up again
    (फाइल फोटोः श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन)

    'खुदा गवाह'मध्ये श्रीदेवी-अमिताभ बच्चन सोबत दिसले होते. दोघांच्या सोबतच्या भूमिकेचा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. श्रीदेवीच्या 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये बच्चन दिसले पण ते केवळ पाहुण्या भूमिकेपुरते. आता तब्बल 24 वर्षांनंतर अमिताभ-श्रीदेवी रसूल पोकुट्टीच्या चित्रपटामध्ये सोबत दिसणार असल्याचे समजते.
    अमिताभ बच्चन, श्रीदेवी या दोन प्रमुख अॅक्टरसोबत चित्रपटामध्ये अनिल कपूर, मनोज बाजपेयी, कोंकणा सेन शर्मा यांचीदेखील भूमिका असणार आहे. चित्रपटाचा विषय दमदार असण्याबरोबरच त्याची कथादेखील तितकीच खोल विषयावर आधारित आहे. रसूल या चित्रपटाचा निर्मातादेखील आहे.

Trending