आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही आहे कमल हसन यांची मोठी मुलगी, पाहा खासगी आयुष्यातील PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- वडील कमल हसन यांच्यासोबत मुलगी श्रुती हसन)
मुंबई- बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन आज (28 जानेवारी) 29 वर्षांची झाली. 15 वर्षांपूर्वी तिने 'हे राम' (2000) सिनेमात कॅमियो भूमिका केली होती. त्यानंतर अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्यासाठी तिला 9 वर्षे प्रतिक्षा करावी लागली. मात्र श्रुतीने आता इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे.
श्रुती हिंदी, तामिळ, तेलगु सिनेमांमध्ये काम करत आहे. अभिनयाच्या बळावर तिची लोकप्रियता दोन्ही इंडस्ट्रीमध्ये वाढत चालली आहे. सिनेमांसोबतच तिची ओळख आयटम डान्सर म्हणूनसुध्दा होते. तिने आतापर्यंत जेवढ्या सिनेमांत अभिनय केला आहे, त्यापेक्षा जास्त सिनेमांत तिने डान्स केला आहे. अलीकडेच तिने अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अभिनीत 'तेवर' सिनेमात 'जोगनिया' गाण्यावर डान्स केला.
कमल हसन यांची मोठी मुलगी आहे श्रुती-
श्रुती दाक्षिणचे सुपरस्टार कमल हसन यांची मोठी मुलगी आहे. त्यांच्या धाकट्या मुलीचे नाव अक्षरा आहे. श्रुतीच्या आईचे नाव सारिका ठाकुर आहे. सारिका 70 आणि 80च्या दशकातील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. श्रुतीने चेन्नईच्या Abacus Montessori शाळेतून शिक्षण घेतले, तसेच मुंबईच्या St. Andrew's कॉलेजमधून सायकोलॉजीमध्ये पदवी घेतली. सोबतच श्रुती कॅलिफोर्नियाच्या Musicians Instituteमधून संगीतसुध्दा शिकली.
हेसुध्दा आहेत श्रुतीचे नातेवाईक-
श्रुतीच्या आई-वडिलांशिवाय अनेक नातेवाईक असे आहेत, ज्यांचा दक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये दबदबा होता. दक्षिणात्य अभिनेते चारु हसन तिचे काका आहेत. तसेच, दक्षिणात्य अभिनेत्री सुहासिनी मणिरत्नम तिची कजिन आहे. तामिल अभिनेत्री अनु हसनसुध्दा तिची कजिन आहे. या सर्वांसोबत वडील कमल हसन यांच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेली गौतमी तडिमल्ला श्रुतीची सावत्र आई आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रुती हसनच्या खासगी आयुष्यातील आणि कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे...