मुंबई - एकीकडे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाचे किस्से रंगत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन आणि क्रिकेटर सुरेश रैना याचं डेटिंग सुरू असल्याची कुणकुण लागली आहे. मात्र हे रिलेशनशीप खासगी ठेवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले आहेत. पण दोघेही आपले संबंध खासगी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. 15 मे 2013 रोजी आयपीएलच्या सामन्यात रैनाच्या चेन्नई सुपर किंग्जला सपोर्ट करण्यासाठी ती मैदानात उपस्थित होती.
दोघेही आपल्या रिलेशनशिपबाबत सीरिअस असून दोघांचं एकमेकांवर अपार प्रेम आहे. पण हे संबंध खासगी राहावेत यासाठी ते सार्वजनिकरित्या भाष्य करण्याचं टाळत आहेत. पण आपल्या बिझी शेड्यूलमधूनही एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. सुरेश रैना आणि श्रुती हसनची भेट मागील वर्षी एका पार्टीत झाली होती. त्यांच्या कॉमन फ्रेण्डने दोघांची भेट घडवून दिली होती.
रैनापूर्वी सिद्धार्थसह होते श्रुतीचे नाते -
श्रुती हसन याआधी 'रंग दे बसंती'मधील अभिनेता सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण ऑक्टोबर 2011मध्ये त्यांचं ब्रेक अप झाल्यानंतर ती सिद्धार्थच्या आयुष्यातून आणि घरातूनही बाहेर पडली. हे दोघे सुमारे दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. तर सुरेश रैना हा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णाला डेट करत होता, अशी चर्चा होती. पण पूर्णाने नेहमीच या गोष्टीचा इन्कार केला होता.
तसे पाहता बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्या प्रेमसंबंधांचे किस्से खूप जुने आहेत. एकीकडे क्रिकेटर्सना या अभिनेत्रींच्या सौंदर्याची भूरळ पडली तर दुसरीकडे या अभिनेत्रीदेखील त्यांच्या मोठ्या चाहत्या आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूडचा संबंध नेहमीच राहिला आहे. काही अभिनेत्री आणि खेळाडूच्या प्रेमाने लग्नाचे स्टेशन गाठले तर काहींचे नाते अफवांपर्यंतच मर्यादित राहिले.
आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगतोय ज्यांनी क्रिकेटर्सबरोबर डेट केले, काहींनी त्यांच्याबरोबर लग्न केले तर एक अभिनेत्री लग्न न करताच आई झाली. जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी पुढच्या स्लाईड्समध्ये..