आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिग्मांशुच्या सिनेमात श्रुती हसन साकारणार मध्यमवयीन स्त्रीची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिछडे सभी बारी बारी' सिनेमामध्ये श्रुती हसन एक तरुणी ते मध्यमवयीन स्त्रीची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक तिग्मांशु धुलियाच्या या सिनेमात इरफान खान, मनोज वाजपेयी, विद्युत जामवाल आणि अमित साध यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. श्रुतीच्या भूमिकेकडे तिचे वडील कमल हसन यांनी त्यांच्या करिअरमध्ये साकारलेल्या भूमिकांसारखे बघितल्या जात आहे. एवढेच नाही तर, जॉन अब्राहमच्या 'द मॅन फ्रॉम नोवेअर' या कोरियान सिनेमाचा बनवण्यात येणा-या 'रॉकी हँडसम' रिमेकसाठीसुध्दा तिच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामध्ये तिची भूमिका एका 8 वर्षांच्या मुलीच्या आईची असणार आहे. दिग्दर्शक निशीकांत कामतचा हा सिनेमा फेब्रुवारी 2015मध्ये रिलीज होणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे.
श्रुती 2014मध्ये 'वेलकम बॅक' सिनेमात दिसणार आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात श्रुतीचा हीरो जॉन अब्राहम आहे. अनीस बज्मीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 19 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. जानेवारी 2015मध्ये श्रुतीचा अक्षय कुमारसोबतचा 'गब्बर' सिनेमासुध्दा रिलीज होणार आहे.
2013मध्ये तिने दोन बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. परंतु तिचे हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडले नाही. 2013मध्ये श्रुतीचे 'डी-डे' आणि 'रमैय्या वस्तावैया' हे दोन सिनेमे आले होते.