आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रुती हासनचे पुन्हा ब्रेकअप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सातत्याने सक्रिय असलेली श्रुती हासन आतापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवू शकली नाही. तरीदेखील ती नेहमीच चर्चेत असते. खासगी आयुष्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना श्रुती कधीच उत्तर देत नाही. सूत्रांच्या मते, तिचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. काही दिवसांपासून ती युवा स्टार नाग चैतन्यशी डेट करत होती. नाग हिंदी आणि दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनचा मुलगा आहे.
श्रुती व नाग यांच्या अफेअरची चर्चा सुरुवातीला गुलदस्त्यात होती. मात्र, दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर याची चर्चा व्हायला लागली. नाग यापूर्वी साऊथ स्टार अनुष्कासोबत डेट करत होता. श्रुती हासनचे नावदेखील यापूर्वी क्रिकेटर सुरेश रैनापासून ते रजनीकांतचा जावई धनुषसोबत जोडण्यात आले होते. कथितरीत्या 'रांझणा' चित्रपटादरम्यान हे प्रेमप्रकरण सुरू होते. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत धनुष आला होता, पण पत्नी ऐश्वर्या काही कारणांमुळे येऊ शकली नसल्याचे स्पष्टीकरणही त्याने दिले. त्यानंतर मात्र धनुष आणि श्रुतीचे मार्ग वेगळे झाले होते.