आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रुतीची \'पिंपल डिंपल\'ची हॉट छायाचित्रे लीक, आई सारिका दाखल करणार तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांची मुलगी श्रुती हसनची मादक छायाचित्रे सोशल मीडियावर लीक झाली आहेत. आगामी 'येवादू' या तेलगु सिनेमात श्रुतीवर 'पिंपल डिंपल' हे शब्द असलेले गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात श्रुतीचा सेक्सी अवतार पाहायला मिळतोय. या गाण्याची छायाचित्रे लीक करण्यात आली आहे. ही छायाचित्रे लीक झाल्यामुळे श्रुती सिनेमाच्या निर्मात्यांवर चांगलीच नाराज झाली आहे. अशी छायाचित्रे लीक होण्यापासून वाचवणे हे निर्मात्यांचे काम असल्याचे श्रुतीचे म्हणणे आहे.
कुणीतरी चुकीच्या पद्धतीने जाणूनबुजून ही छायाचित्रे लीक केली असल्याचे श्रुतीचे म्हणणे आहे. अज्ञात व्यक्तिविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे श्रुती आणि तिची आई अभिनेत्री सारिका यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे श्रुतीच्या आगामी 'रेस गुर्रम' या सिनेमाला प्रसिद्धी मिळावी, यासाठी असे करण्यात आले असल्याची चर्चा आहे. असो, आता सत्य काय हे तर श्रुती आणि सिनेमाच्या निर्मात्यांनाच ठाऊक.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा श्रुतीची सोशल साइट्सवर लीक झालेली छायाचित्रे...